करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

सिन्नर तालुक्यात नव्या २५ रुग्णांची वाढ

रुग्णसंख्या ८९८ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर | Sinner

तालुक्यात नवे २५ रुग्ण आढळले असून शहरात १४ तर ग्रामीण भागात ११ रुग्णांचा समावेश आहे.

शहरात रेणुका नगर ४१ वर्षीय पुरुष, उद्योग भवनजवळ ५७ व २४ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय महिला, शंकर नगर ३१ वर्षीय पुरुष, खर्जे मला ४९ वर्षीय पुरुष, शिवाजी नगर २३ वर्षीय युवक, विजय नगर ४९ वर्षीय महिला, महालक्ष्मी नगर ४० वर्षीय पुरुष, लोंढे गल्ली ३३ वर्षीय युवक, सरदवाडी रोड ३२ वर्षीय महिला व ६ वर्षीय बालक, संजीवनी नगर ३२ वर्षीय महिला, वृंदावन नगर ४७ वर्षीय पुरुष यांचा त्यात समावेश आहे.

ग्रामीण भागात मानोरी येथे ६८ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला व २० वर्षीय युवती, बारागाव पिंपरी ५७ व ५८ वर्षीय पुरुष, सोनारी ६९ वर्षीय पुरुष, दोडी बुद्रुक ३४ वर्षीय पुरुष, मनेगाव ३९ वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगी व ३ वर्षीय बालक बाधित असल्याचा अहवाल आला आहे.

मुसळगाव-गोंदे रोडवर ३६ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या या २५ रुग्णांमुळे तालुक्यातही रुग्णांची संख्या ८९८ झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com