पांगरी l Pangari (वार्ताहर)

येत्या ४ जानेवारी रोजी माघारीची मुदत संपल्यानंतर पांगरी बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात अकरा जागेसाठी पंचवीस उमेदवार आपले नशीब अजमावत आहे.

१५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण पस्तीस उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. एकूण चार प्रभाग असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सर्वात जास्त अर्ज प्रभाग दोन मधून एकूण १२ अर्ज तर सर्वात कमी अर्ज प्रभाग तीन मधून एकूण सहा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले होते.

प्रभाग एक व चार मधून अनुक्रमे नऊ व आठ अर्ज प्राप्त झाले होते. ३१ डिसेंबर रोजी झालेल्या अर्ज पडताळणीत सर्वच्या सर्व पस्तीस अर्ज वैध ठरले होते.

जसजसे अंतिम माघारीची मुदत जवळ-जवळ येऊ लागली तस तशा ग्राम पातळीवर नातेवाईक, कुळी, भाऊबंद, यांच्या बैठकांना उधान येऊ लागले होते. सुरुवातीला गावात चार पॅनल निर्माण होतील असे चिन्ह दिसत होते.

परंतु जसजशी चाचपणी होऊ लागली तास तशी पगार पॅनल वगळता इतर पॅनलने आपली ताकत अजमावत एकत्र येण्याचा विचार केला. आणि माघारी नाट्यातून अकरा उमेदवारांनी माघार घेतली. अशा प्रकारे निवडणुकीच्या रिंगणात एकूण २५ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

या निवडणुकीत "परिवर्तन विकास पॅनल" विरुद्ध संत हरीबाबा विकास पॅनल अशी दुरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग एक मध्ये तीन जागांसाठी रभाजी पगार, नूतन निरगुडे, मनिषा पगार या परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांनी सोमनाथ निरगुडे, राधिका निरगुडे, सुरेखा पगार आणि स्वाती दळवी यांच्या विरूद्ध कडवे आव्हान उभे केले आहे.

प्रभाग दोन मधून अक्षय निरगुडे, राजेंद्र पेखळे, संगीता पांगारकर, भारत आवारी यांच्या विरोधात बाबासाहेब पगार, शिवाजी पवार आणि सुभद्राबाई पगार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. या प्रभागात या निवडणुकीसाठी एक जागा वाढ झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

प्रभाग तीन मधून दोन जागांसाठी संजय पगार आणि सुवर्णा वारुळे हे बहुचर्चित उमेदवार जगदीश पांगारकर आणि प्रियांका पांगारकर यांच्या विरोधात उभे आहेत. तर प्रभाग चार मधून रईस कादरी, सविता निकम, विद्या पगार यांचे मोठे आव्हान मंद रोकडे,स्मिता निकम, प्रियांका निरगुडे यांच्या विरोधात आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग तीन मधून निवडून आलेला उमेदवार सरपंच झाला होता. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीत एक जागा कमी झाल्याने फक्त दोन जागांसाठी मतदान होणार आहे. सरपंच पदासाठी या प्रभागाचे योगदान सर्वात मोठे राहिले आहे. त्यातल्या त्यात येथील पाथरवट समाजाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज मतदारांचा मोठा गठ्ठा निर्णायकी ठरणार असल्याने संपूर्ण गावाचे लक्ष या प्रभागाकडे लागले असून येथील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

परिवर्तन विकास पॅनल आणि संत हरीबाबा विकास पॅनल या दोन्ही पॅनलने संत हरीबाबा मठात बाबांना श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. सुरुवातीला परिवर्तन विकास पॅनल तर्फे पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, बाबासाहेब पगार, रईस कादरी, सविता निकम, प्रभाकर सोनवणे, विठ्ठलराजे पगार, चंद्रभान पगार, रामभाऊ पगार, ज्ञानदेव पगार , विलास वारुळे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.

या प्रसंगी निकम, कादरी, अभंग, पगार, कलकत्ते, निरगुडे, वाळूंज, कांडेकर, हासे पवार, आदी कुळीतील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर माजी सभापती रमेश पांगारकर, विलास पांगारकर, अनिल निरगुडे यांच्या संत हरीबाबा विकास पॅनलने श्रीफळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा केला.

या प्रसंगी बळवंत निरगुडे, राजेंद्र पेखळे, शांताराम वारुळे, सोमनाथ पेखळे, जगदीश पांगारकर, संदीप पांगारकर, प्रकाश पांगारकर, ज्ञानेश्वर पांगारकर, कचरू निकम, अक्षय निरगुडे आदी उपस्थित होते.