सिन्नर : सोमठाणे येथे २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

नेहरू युवा केंद्राच्या वतीने
सिन्नर : सोमठाणे येथे  २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

पंचाळे । Panchale

नाशिकच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने सोमठाणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले .

नेहरू युवा केंद्र नाशिक , महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा रुग्णालय नाशिक,ग्रामीण रुग्णालय दोडी यांच्या संयुक्त विद्यमाने बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था सोमठाणे यांनी एड्स जनजागरण अभियान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नेहरू युवा केंद्र नाशिक जिल्हा युवा समन्वयक कमल त्रिपाठी, लेखापाल सुनील पंजे, दिलीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरु युवा केंद्राचे तालुका राष्ट्रीय युवा स्वंयसेवक संदीप थोरात बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेचे संचालक संतोष साळवे यांनी गुलाब पुष्प देऊन रक्तदात्यांचे स्वागत केले. यावेळी 25 पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. उपस्थित युवकांना व्हॅलेंटाईन डे निमित्ताने गुलाब पुष्प देण्यापेक्षा रक्तदान करुन एखाद्या व्यक्तीला जीवनदान द्यावे हि संकल्पना मांडण्यात आली.

या रक्तदान शिबिरात पंचाळे आणि सोमठाणे परिसरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. शिवाजी लहाडे, श्रीमती किरण वैष्णव, बी.बी.आव्हाड, अनिल मोरे, निलेश चव्हाण, राजू मोरे, सागर पगारे, रुद्र साळवे, ग्रामीण रुग्णालय दोडी चे डॉ. विलास बोडके आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल थोरात,प्रमोद थोरात, सागर थोरात, जगदीश थोरात, महेश थोरात यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com