नाशिकमध्ये आरटीईचे २४४६ प्रवेश निश्चित
नाशिक

नाशिकमध्ये आरटीईचे २४४६ प्रवेश निश्चित

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आरटीई प्रवेशांतर्गत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २४४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, वेगवेगळ्या शाळांमध्ये २ हजार ६८१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे.

करोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात या प्रवेश प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.

त्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतिम प्रवेश निश्चित केले जात असल्याने यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत एकच लॉटरी झालेली असतानाही प्रवेशप्रक्रिया लांबली आहे. आता लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपूर्वी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

एका शालेय संघटनेने गेल्या पंधरवड्यापासून आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यास प्रतिकूल भूमिका घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. अशा विद्यार्थ्यांना लॉटरीत निवड होऊन प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com