
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Agricultural Produce Market Committees) निवडणूक प्रक्रियेने आता जोर धरला आहे. सोमवारी (दि.3) अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. 14 बाजार समित्यांमधील एकूण 252 जागांसाठी विक्रमी 2421 अर्ज दाखल झाले आहेत.
प्राप्त अर्जांची बुधवारी दि.५ एप्रिल रोजी छाननी (Scrutiny) होणार असून ६ एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांनी उडी घेतल्यामुळे ही निवडणूक आता चुरशीची होणार,अशी चिन्ह आहेत.
मात्र, अर्ज माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांपैकी सहकारी संस्था गटामध्ये 1458, ग्रामपंचायत मतदार संघात 680, व्यापारी मतदारसंघात 185 तर हमाल व मापारी मतदारसंघात 98 असे एकूण 2421 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज (Application) दाखल करनारांची संख्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 309 तर सर्वात कमी म्हणजेच अवघे २५ उमेदवारी अर्ज दाखल सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी करिता दाखल झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीकरीता मतदार संघनिहाय दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे - सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समिती -25, देवळा -147, घोटी बुद्रुक -१६०, पिंपळगाव बसवंत -३०९, चांदवड -193, नाशिक -175, येवला -217, नांदगाव -148, सिन्नर -180, कळवण -132, मनमाड -150, मालेगाव -202, लासलगाव -211, दिंडोरी -172, एकूण - 2421
अशी होईल उमेदवारी अर्जांची छाननी
उमेदवार अर्जांची छाननी पुढीलप्रमाणे होईल - हमाल व तोलारी, व्यापारी, ग्रामपंचायत विभाग अंतर्गत आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती व जमाती, सर्वसाधारण. सहकारी संस्थांमधील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण या क्रमाने ही अर्जांची छाननी होणार आहे, अशी माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी (Election Adjudicating Officer) मुंडावरे यांनी दिली.