करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

जिल्ह्यात चोवीस तासात करोनाचे २४२ रुग्ण

करोनाग्रस्तांची संख्या ६७२१ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून आज चोवीस तासात जिल्ह्यात दुसर्‍यांदा विक्रमी 14 बळी गेले आहेत. करोना बळींची संख्या 326 झाली आहे. तर 242 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या 6 हजार 721 झाली आहे.

एकाच दिवसात जिल्ह्यातून 819 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील 6 रूग्णांचा मृत्यू झाल्याने तर एकाच दिवसात 223 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण 242 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

यामध्ये शहरातील 144 रूग्ण आहेत. यात शहरातील पंचवटी हिरावाडी, पेठरोड , जुने नाशिक, म्हसरूळ, आडगाव, नाशिकरोड येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 3 हजार 864 वर पोहचला आहे.आज ग्रामिण भागातील 74 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 1 हजार 579 झाला आहे.

यामध्ये सर्वाधिक मनमाड, ओझर, सिन्नर, अंबेबहुला, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, विल्होळी, कसबे सुकेणे येथील रूग्ण आहेत. शांत असलेल्या मालेगामध्ये आज 23 रूग्ण पॉझिटिव्ही आले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 141 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 137 वर स्थिर आहे. तर करोनामुळे आज दुसर्‍यांदा विक्रमी 14 जणांचा मत्यू झाला. यापुर्वी मागील आठवड्यात 24 तासात 14 मृत्यू झाले होते.

यामध्ये सर्व नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 326 झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील विक्रमी 223 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 4 हजार 270 वर पोहचला आहे. करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने तब्बल 819 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत.

यामध्ये नाशिक शहरातील 606 आहेत. जिल्हा रूग्णालय 7, ग्रामिण 165, मालेगाव 10, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 4 व होम कोरोंटाईन 24 रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून 27 हजार 460 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 20 हजार 3 निगेटिव्ह आले आहेत. 6 हजार 721 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 2 हजार 125 रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार*

एकूण करोना बाधित : 6721

नाशिक : 3864

मालेगाव : 1141

उर्वरित जिल्हा : 1579

जिल्हा बाह्य : 137

एकूण मृत्यू : 326

करोनामुक्त : 4270

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com