२४ टक्के नागरिक दुसर्‍या लस मात्रेपासून दूरच

95 टक्के नागरिकांना पहिली मात्रा
२४ टक्के नागरिक दुसर्‍या लस मात्रेपासून दूरच

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाने करोना नियमामध्ये सूट दिली असली तरी करोनाचा ( Corona )धोका काही प्रमाणात कायम आहे. यामुळे नागरिकांमध्ये सतत जनजागृती ( Awarness ) करण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक शहरातील 95 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 76 टक्के नागरिकांनी दोन डोस पूर्ण केले आहेत. दरम्यान, 37 हजार 952 जणांना महापालिकेच्या वतीने आतापर्यंत बूस्टर डोस (Booster dose )देण्यात आले आहेत. शहरातील तीस ठिकाणी सतत लसीकरण ( Vaccination )मोहीम सुरू आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मागील सुमारे दीड वर्षापासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र हळूहळू गर्दी कमी होत गेली आहे.

त्याचप्रमाणे मध्यंतरी पुन्हा नवीन व्हेरीएंट समोर आल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, शहरातील 30 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शहरातील 13 लाखांंपेक्षा जास्त नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्याची टक्केवारी 95 टक्के इतकी असून 10 लाख पेक्षा जास्त नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्याची टक्केवारी 76 टक्के इतकी झाली आहे.

त्याचप्रमाणे 37 हजार 952 जणांनी बूस्टर डोस घेतला असून 12 ते 14 वयोगटातील सुमारे पंचवीस हजार लहान मुलामुलींनी लस घेतली आहे. दरम्यान, करोनाला संपूर्णपणे हद्दपार करण्यासाठी नाशिक शहराचे 100% लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन आपले दोन्ही डोस लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.