60 फूट उंचीवर फडकवला 24 फुटी तिरंगा

60 फूट उंचीवर फडकवला 24 फुटी तिरंगा

देवळाली कॅम्प | Deolali Camp

गेल्या वर्षभरापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या आदर्श सैनिक फाउंडेशनच्या (Adarsh Sainik Foundation) माध्यमातून शहिद जवानांच्या स्मारकाजवळ तिरंगा ध्वज उभारणीसह विकास करण्याचे कार्य हे निश्चितच या देशासाठी दीपस्तंभासारखे होईल, असे प्रतिपादन मुंबई येथील समाजसेवक व जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत राऊत (Jaywant Raut) यांनी केले... 

सिन्नर तालुक्यातील (Sinnar taluka) सोनारी येथे शहीद लान्स नायक राकेश आनेराव (Rakesh Anerao) देशासाठी २४ जून २००५ रोजी सीमेवरील श्रीनगर येथे कर्तव्यावर असतांना बलिदान देणाऱ्या आनेराव यांच्या स्मारकाजवळ स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कायमस्वरूपी ६० फूट पोलवर २४ फूट राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्यात आला. त्यावेळी राऊत बोलत होते.

व्यासपीठावर समाजसेविक भाग्यश्री राऊत, जयवंत राऊत, प्रख्यात कुस्तीपटू रामसिंग सांगा, वीरनारी रेखा खैरनार, मिसेस इंडिया इंटरनॅशनल अवॉर्डप्राप्त शिल्पी अवस्थी, नायक दीपचंद, कुंदन पारीक, वीरनारी रेखा खैरनार, सिन्नरच्या माजी सैनिक आघाडीचे अध्यक्ष मधुकर सोनवणे, शहीद आनेराव यांचे वडील दशरथ आणेराव बंधू योगेश आणेराव, सुरेश आणेराव व कुटूंबियांसह उपस्थित होते.

प्रास्ताविकातून कुंदन पारीक यांनी संस्थेच्या माध्यमातून देशभर करण्यात येत असलेल्या कार्याची विशद केली. यावेळी प्रमुख अतिथीय मार्गदर्शनातून कुस्तीपटू रामसिंग सांगा यांनी निरोगी शरीर हि खरी संपत्ती असून या संप्पतीचा वापर प्रत्येक तरुणाने देशसेवेसाठी करण्याचे आवाहन केले.

मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांनी सांगितले की, शहिदांच्या स्मृती जोपासणे हे अत्यंत गरजेचे असून त्यातून पुढील पिढीवर देशसेवेचे संस्कार घडले जातात. सूत्रसंचालन विजय कातोरे, प्रशांत धिवंदे यांनी केले.

कार्यक्रमास तुकाराम झनकर, अर्जुन ढाकणे, योगेश ठोक, कृष्णाबाई बोडके, हिराबाई पारस्कर, भारती पगार, सुषमा मोरे, कमल लहाने, यशोदा गोसावी, माजी सैनिक खंडू पवार, सुभेदार डहाळे, रवींद्र राजोळे, राजेंद्र कातोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com