२३४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप
नाशिक

२३४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी Nashik

खरीप हंगामात शेतकर्‍यांना पीककर्ज वाटप करण्यात याही वर्षी जिल्हा बँकाच आघाडीवर आहेत.राज्यातील बँकांनी आत्तापर्यंत अवघे 50 टक्के उद्दिष्ट गाठले आहे.

जिल्हा बँकांनी सर्वाधिक 88 टक्के तर व्यापारी बँकांनी उद्दिष्टाच्या फक्त 35 टक्के कर्जवाटप केले आहे. यामध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कर्जवाटपाचा आकडा आता 234 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

खरिप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले आहे. मात्र, खासगी क्षेत्रातील बँका शेतकर्‍यांना कर्ज देण्यास उत्सुक नसल्याचे याही वर्षी दिसून आले. पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करणार्‍या चार बँकांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोटीसही बजावली होती.

मात्र , या बँकांचा कर्जवाटपाचा आकडा वाढलेला नाही. मात्र, जिल्हा बँकेने आतापर्यंत 236 कोटी रुपयांचे वाटप केले असून, यापुढेही वाटप चालू राहणार आहे. यात निफाड तालुक्यात सर्वाधिक 81 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघे 41 लाख रुपये वाटप झाले आहे.

गती वाढविणार

जिल्ह्यातील 24 हजार शेतकर्‍यांना हे पीककर्ज मिळाले. यंदा जिल्हा बँकेला 628 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले आहे. त्यामुळे पीककर्ज वाटपात अजून गती वाढवावी लागणार आहे. दरम्यान, जिल्हा बँकेला शेतकरी कर्जमुक्तीचे 780 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पात्र शेतकर्‍यांना कर्जवाटप केले जात आहे. - केदा आहेर ,अध्यक्ष नाशिक जिल्हा बँक

बोलके आकडे

45,778 कोटी: सर्व बँकांचे उद्दिष्ट 22,780 कोटी: पीककर्ज वाटप 32,517 कोटी: व्यापारी बँकांचे उद्दिष्ट 11,196 कोटी: वाटप (अवघे 35 टक्के) 13, 261 कोटी: सहकारी बँकांचे उद्दिष्ट 12, 574 कोटी: कर्ज वाटप (88टक्के)

तालुकानिहाय कर्जवाटप

नाशिक-23 कोटी 88 लाख

सिन्नर-10 कोटी

निफाड-81 कोटी 90 लाख

दिंडोरी-46कोटी

सुरगाणा-51 लाख

पेठ-2 कोटी

इगतपुरी-२ कोटी

मालेगाव-16 कोटी 15 लाख

सटाणा-10 कोटी

कळवण-63 कोटी

देवळा-10 कोटी

चांदवड-6 कोटी 67 लाख

येवला-17 कोटी 45 लाख

नांदगाव-4 कोटी

त्र्यंबकेश्वर-41 लाख

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com