जिल्ह्यात आतापर्यंत २३ टक्के पाऊस

शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
पाऊस
पाऊस

नाशिक | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) आज सकाळ पासुन पावसाला (Rain) सुरवात झाली. मात्र अल्पवधीतच पावसाने माघार घेतली.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात In Nashik District) अद्यापही चांगला पाऊस झाला नसून शेतकऱ्यांसह (Farmer's) जनता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

दरम्यान काल इगतपुरीत (Igatpuri) ४०, नांंदंगावला (Nandgoan) ३७, पेठला (Peth) ०४, त्र्यंबकेश्वरला (Trimbak) ०७, चांंदवडला ०३, कळवणला १२, बागलानला ५६, देवळ्यात ४०, सिन्नरला ११, येवल्यात १५ मिलीमिटर पाऊस झाला. आता पर्यंंत जिल्ह्ययात २३ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच काळात३६ टक्के पाऊस झाल होता.

आज नाशिकसह जिल्ह्यातील काही भागांत सकाळ पासुन ढगाळ हवामान कायम आहे. तर दमदर पावसाच्या प्रतीक्षेत सगळेच आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com