जिल्ह्यात २२६ नवे करोनाबाधित
नाशिक

जिल्ह्यात २२६ नवे करोनाबाधित

आकडा ७ हजारांच्या उंबरठ्यावर

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढत चालला असून आज चोवीस तासात जिल्ह्यात २२६ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या ६ हजार ९४७ झाली आहे. रात्रीतून हा सातहजाराचा टप्पा पार होण्याचा अंदाज आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून ८२९ नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात २४९ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

काल रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात एकुण २२६ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील १७९ रूग्ण आहेत. यात शहरातील पंचवटी हिरावाडी, पेठरोड, जुने नाशिक, म्हसरूळ, आडगाव, नाशिकरोड येथील रूग्णांचा समावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा ४ हजार ४३ वर पोहचला आहे.

आज ग्रामीण भागातील ४७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा १ हजार ६२६ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक इगतपुरी, लासलगाव, पळसे, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, विल्होळी, दिंडोरी, नांदगाव, देवळाली कॅम्प, लहवीत, भगुर येथील रूग्ण आहेत. मालेगामध्ये काल एकही रूग्ण पॉझिटिव्ह आला नाही. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार १४१ वर स्थिर आहेे.

जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १३७ वर स्थिर आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अधिक नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ३३२ झाला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील २४९ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणार्‍यांचा आकडा ४ हजार ५१९ वर पोहोचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने तब्बल ८२९ संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ५७६ आहेत. जिल्हा रूग्णालय १५, ग्रामिण १३६, मालेगाव १९, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ५ व होम कोरोंटाईन ७८ रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून २८ हजार २२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील २० हजार २१३ निगेटिव्ह आले आहेत. ६ हजार ९४७ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ हजार ९६ रूग्ण उपचार घेत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com