जिल्ह्यात २१८ पोलीस कोरोना बाधित

दुसर्‍या लाटेत चार पोलिसांचा मृत्यू
करोना बाधित
करोना बाधित

नाशिक । Nashik

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शहर व ग्रामिण पोलिस दलातील १८ अधिकारी तर २०० कर्मचारी असे एकुण १२८ पोलीस कोरोना

पॉझिटिव्ह झाले आहेत तर चौघांचा मृत्यू झाला असून, त्यातील ३० अधिकारी व कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर परतले आहेत.

शहर आणि ग्रामीण पोलिस दलामध्ये करोनाचा प्रसार जोमात होत असून, संचारबंदी नियमांच्या पालनाची जबाबदारी असलेल्या पोलिस खात्याला करोनाचा सामना करावा लागत आहे. संचारबंदी नियमांचे पालन सुद्धा नागरिक करीत नसल्याने अखेर पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले आहे.

एकीकडे वाढत असलेला करोना आणि दुसरीकडे नियमांचे पालन करण्यासाठी रस्त्यावर उतरून करावी लागणारी कारवाई यात पोलिस सापडले आहेत. आजमिती सशहरात आणि जिल्ह्यात करोनाचा प्रसार जसा जसा वाढतो आहे तसे पोलिसांमध्ये त्याची तीव्रता वाढते आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस पोलिसांमध्ये पुन्हा करोना परतला. तेव्हांपासून ही वाढ आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत शुक्रवारपर्यंत शहर पोलिस दलातील १८ पोलिस अधिकारी तर १४५ कर्मचारी बाधित झाले. एकूण १६३ पोलिसांपैकी ९ अधिकारी व १५ पोलिस कर्मचारी असे २४ जन करोनावर मात करून कर्तव्यावर हजर झाले आहेत. सध्या ९ अधिकारी आणि १२६ कर्मचारी अशा १३५ जणांवर उपचार सुरू आहेत. शहर पोलिस दलात पहिल्या लाटेत सत जणांचा मृत्यू झाला होता.

आता दुसरी लाट त्यापेक्षा तीव्र ठरली असून, अवघ्या दीड महिन्यात चार जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. परिमंडळ एकमधील एक, परिमंडळ दोनमधील दोन तर, पोलिस मुख्यालयातील एक अशा चार जणांचा करोनाने बळी गेला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत पोलिसांची संख्या तुलनेत जास्त दिसून येते आहे. ग्रामीण पोलिस दलामध्ये हे प्रमाण ५५ इतके आहे. त्यापैकी ४९ जणांना होम क्वारंनटाईन करून उपचार केले जात आहेत. शहर पोलिसांनी सर्वच पोलिसांसाठी मुख्यालयात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

त्यात पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबियांना उपचार मिळत आहेत ही समाधानाची बाब असल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. मागील वर्षभरात कोरोना पॉझिटिव्हमध्ये ग्रामीण पोलिस दलाचा आकडा मोठा होता. प्रामुख्याने मालेगाव येथे कार्यरत असलेल्यांना मोठी बाधा झाली होती. मात्र या दुसर्‍या लाटेत अद्याप तरी मालेगाव शहर नियंत्रणात आहे. ग्रामिण प ोलीस दलाचे सर्व ५५ कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाली. त्यापैकी ४९ जणांना होम क्वारंनटाईन करून उपचार केले जात आहेत.

----

पोलीस यंत्रणा आरोग्य यंत्रणेबरोबरीने पहिल्या फळीत कार्यरत आहे. आम्ही पोलीसांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करत होतो. परंतु

नागरीकांच्या अवैचारीकपणामुळे अखेर पोलीसांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. तरिही तात्काळ उपचारांसाठी पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र कोवीड सेंअर सुरू करण्यात आले आहे.

- दिपक पांडे, पोलीस आयुक्त

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com