नाशिक जिल्ह्यात आज २१६ करोनाबाधित आढळले; चार रुग्ण दगावले

नाशिक जिल्ह्यात आज २१६ करोनाबाधित आढळले; चार रुग्ण दगावले

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये आज करोनाबाधित रुग्णांची संख्या काहीशी वाढली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्ण वाढले असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभरात आज जिल्ह्यात २१६ रुग्ण बाधित आढळले. तर चार रुग्णांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला.

दिवसभरात आज १४२ रुग्ण करोनामुक्त झाले. तर नाशिक मनपा क्षेत्रात १३३, ग्रामीणमध्ये ७३, मालेगाव मनपा क्षेत्रात ४ तर जिल्हाबाह्य ६ रुग्ण आज बाधित आढळले आहेत.

आज पोर्टल वर एकूण २६७ मृत्यु नोंदवले गेले आहेत. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रात १६६, मालेगाव मनपा क्षेत्रात ०१ तर नाशिक ग्रामीणमध्ये १०० रुग्ण नोंदवले गेले आहेत.

तर दुसरीकडे दिवसभरात आज दिवसभरात ४ रुग्ण दगावले असून तिघे ग्रामीणमधील तर एक रुग्ण नाशिक मनपा परिसरातील असल्याची नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com