विविध विकासकामांसाठी 2.15 कोटींचा निधी : भुसे
कृषीमंत्री दादा भुसे

विविध विकासकामांसाठी 2.15 कोटींचा निधी : भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मालेगांव (malegaon) बाहय मतदार संघात (constituency) नागरी सुविधा, यात्रास्थळ विकास, अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे या योजनेतील विविध विकासकामांसाठी सुमारे 2 कोटी 15 लक्ष रूपयांचा निधी मंजूर (funding approved) करण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी दिली आहे.

नागरीसुविधा योजनेंतर्गत तालुक्यातील वडेल, करंजगव्हाण, चंदनपुरी, दाभाडी या गावांमध्ये गांवअंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरणासाठी (Concreting of roads) 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत (Pilgrimage Development Schemes) करंजगव्हाण येथील श्री विंध्यवासिनी देवी मंदिर येथे भक्तनिवास बांधणे तसेच तळवाडे येथील दुंधेश्वर मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे या विकासकामांसाठी 23 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले आहेत.

अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणेकामी चिंचवे गा., दाभाडी, घाणेगांव, हाताणे, कुकाणे, खडकी, मुंगसे, पाटणे, राजमाने, रावळगांव, टेहरे, तळवाडे, वनपट, विराणे, वाके, वजिरखेडे, झोडगे, सौंदाणे, सातमाने इ. गावांमध्ये रस्ता काँक्रीटीकरण, पाण्याची टाकी व पाईपलाईन, पाणीपुरवठा, समाजमंदिर दुरुस्ती, भुमिगत गटार आदी विकासकामांसाठी 1 कोटी 62 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com