नाशिकमध्ये १३ दिवसात २१ हजारावर अँटीजेन चाचण्या

मिशन झिरोला नागरिकांकडून प्रतिसाद
नाशिकमध्ये १३ दिवसात २१ हजारावर अँटीजेन चाचण्या
मिशन झिरो नाशिक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोकण्यासाठी विविध उपाय योजना करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या मदतीला धावलेल्या सामाजिक संघटनांच्या पढाकाराने शहरात मिशन झिरो सुरू झाले आहे. याअंतर्गत प्रतिबंधीत क्षेत्रातील वृध्द व बालकांना उपचार मिळावेत म्हणुन सुमारे 25 फिरत्या दवाखान्यातून उपचार केले जात आहे. यातून गेल्या 13 दिवसात 21 हजारावर अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या.त्यात 2276 करोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

नाशिक शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असुन गेल्या जुलै महिन्यात 7 हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले आहे. आत्तापर्यत शहरात एकुण 12 हजार 39 बाधीत आढळून आले असुन साडेआठ हजार रुग्ण बरे झाले आहे. ऑगस्ट महिन्यात च्या पाच दिवसात 7 हजार 618 नवीन रुग्ण आढळून आले असुन प्रति दिन पाचशेच्यावर रुग्ण आढळ आहे. हा करोनाचा संसर्ग रोकण्यासाठी शहरात मिशन झिरो सुरु करण्यात आले आहे.

महापालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व इतर स्वंयसेवी संस्थांकडुन शहरात करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी 25 फिरते दवाखाने सुरु करण्यात आले आहे. प्रतिबंधीत क्षेत्र व झोपडपट्टी परिसरात या दवाखान्यातून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे. या एकात्मिक कृती योजनेतून नागरिकांची आरोग्य तपासणीकरुन पॉझिटीव्ह रुग्ण शोधुन काढण्याचे काम केले जात आहे.

याद्वारे नवीन रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्याकडुन होणारा संसर्ग टाळण्याचे काम केले जात आहे. या मिशन झिरोमधुन तेराव्या दिवशी 1246 नागरिकांची तपासणी करण्यात आली. गेल्या तेरा दिवसात 21 हजार 382 अँटीजेन चाचण्या करण्यात आल्यानंतर यात 2276 करोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

मिशन झिरो अभियान सुचनासाठी हेल्पलाईन

नाशिककरांकडुन मिशन झिरो यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात शहरातील डॉक्टर्स , फार्मासिस्ट, लॅब टेक्नीशियन, सैफी अ‍ॅम्बुलन्स कॉपर्स, अनेक सामाजिक - राजकिय कार्यकर्त्याचे पाठबळ मिळत आहे. या अभियानाकरिता कोणाला सुचना करावयाच्या असल्यास त्यांनी 8669668807 या मोबाईल व्हॉटस्अ‍ॅप नंबर पाठवाव्यात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com