ऑनलाईनद्वारे एकवीस लाख सातबारे उतारे डाउनलोड

सातबारा संगणीकरण : प्रशासनात गतीमानता
ऑनलाईनद्वारे एकवीस लाख सातबारे उतारे डाउनलोड

नाशिक । Nashik

ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून डिजीटल स्वाक्षरीचे उतारे डाउनलोड करणे शक्य झाले असून आतापर्यंत तबबल २१ लाख २२ हजार १५५ जणांनी हे उतारे डाउनलोड करून घेतले आहेत.

याशिवाय आठ अ, फेरफार असे एकूण ३३ लाख ३५ हजार २६६ उतारे डाउनलोड करण्यात आले आहेत. संगणीकृत सातबार्‍यामुळे तलाठी कार्यालयाच्य‍ा उंबरठा न झिजवता एका क्लिकवर दाखले घरबसल्या मिळवणे सहज शक्य झाले आहे.

नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागू नये व प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणावी यासाठी शासनाने सातबारे व विविध दाखल्यांचे संगणीकरण केले अाहे. जिल्ह्यातही सात बारा उताऱ्यांचे संगणकीकरण‍ाचे काम प्रगतीपथावर अाहे. करण्याचे काम सुरू होते.

आता बहुतांश सातबारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी झाल्याने हे उतारे घरबसल्याच डाउनलोड करणे नागरिकांना शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे यासाठी तलाठी कार्यालये, तहसील कार्यालयांचे उंबरे झिजविण्यापासून देखील नागरिकांची मुक्तता झाली आहे. जमीन खरेदी विक्री, कर्ज प्रकरणे व तत्सम अनेक कारणांनी नागरिकांना या उताऱ्यांची आवश्यकता भासत असते. त्यासाठी तलाठी कार्यालयांत नागरिकांची गर्दी उसळायची.

उतारे देण्यासाठी अडवणूक होत असल्याच्या तक्रारी देखील वाढल्या होत्या. तलाठी व मंडळ अधिकारी उपलब्ध न होणे, त्यांच्याकडून उतारे देण्यास दिरंगाई होणे, पैशांची मागणी होणे यासारखे प्रकार घडत असत.

हे प्रकार टाळण्यासाठी आता डिजीटल उताऱ्यांची सुविधा उपलब्ध झाली आहे. जमिनीच्या मूळ मालकापासून त्यात वेळोवेळी होत गेलेल्या बदलांच्या नोंदी ऑनलाईन सहज उपलब्ध होत आहे.

डाऊनलोड केलेले उतारे

सात बारा उतारे - २१ लाख २२ हजार १५५

आठ अ - ९ लाख ३ हजार ६०४

फेरफार - ३ लाख ९ हजार ५०७

एकूण - ३३ लाख ३५ हजार २६६

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com