करोनाची रुग्णसंख्या घटली; दिवसभरात आढळले २१ पॉझिटिव्ह

करोना
करोना

नाशिक । Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या (Corona Patients) पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र आज ही रुग्णसंख्या थोडी कमी झाली असून जिल्ह्यात दिवसभरात २१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत...

सध्या एकूण ६३४ रुग्ण करोनावर (Corona) उपचार घेत आहेत. तर गेल्या २४ तासात नाशिक मनपा (Nashik NMC) क्षेत्रात १६ रुग्ण तर नाशिक ग्रामीण (Nashik Rural) क्षेत्रात ०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तसेच मालेगाव (Malegaon) क्षेत्रात आज एकही रूग्ण आढळला नाही. तर जिल्हाबाह्य एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तर आज करोनाने (Corona) एकही मृत्यू झाला नाही.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ९०२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर आज ९९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com