
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी (Swami Vivekananda Society) संचलित, श्रीमान टी.जे. चौहान माध्यमिक विद्यालयाच्या 205 विद्यार्थ्यांनी श्री समर्थ रामदास स्वामी (Shri Samarth Ramdas Swami) यांच्या 205 मनाच्या श्लोकांची सुलिखित गाथा बालाजी चरणी अर्पण केली.
हा एक प्रकारचा जागतिक विक्रमच (world record) असल्याचे संयोजकांडून सांगण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विक्रम सारडा (President of the organization Vikram Sarada) व विश्वस्तांची भरभक्कम साथ, शिक्षिका अलका चंद्रात्रे यांची संकल्पना यांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
दरम्यान, शंकराचार्य न्यासाने (Shankaracharya Nyas) या कार्यक्रमास सहकार्य केले. तसेच, विद्यार्थ्यांना श्लोकाचे धडे पुजा गायधनी व कामिनी यांनी दिले. सचीन चंद्रात्रे, आसावरी खांडेकर, उदय कुलकर्णी, मिना निकम, यांनी अतीशय सुंदर सुरांनी येथील वातावरण निर्मीती केली.
यासाठी सुमारे 40 विद्यार्थ्यांनी श्लोक पठन करुन वातारवण प्रसन्न केले होते. यावेळी मुर्तीकार, यतीन पंडीत यांनी प्रभु श्रीरामचंद्रांची मूर्ती बनवून उपस्थितांचे लक्ष वेधले. शंकाराचार्य न्यासातर्फ प्राथमिक स्वरुपात संस्थेचे अध्यक्ष विक्रम सारडा, शिक्षिका अलका चंद्रात्रे, सचिन चंद्रात्रे, अभिनेते सी. एल. कुलकर्णी, एन.सी. देशपांडे, विनायक रानडे, अॅड अविनाश भिडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम सुरु असताना बालाजी मंदीराच्या प्रांगणात समर्थ रामदास स्वामींचे सुंदर शिल्प साकारण्यात आले होते. विक्रम सारडा यांनी सपत्नीक श्री बालाजींची (Balaji) आरती केली. त्यानतंर कार्यक्रमाची सांगता झाली.