हॉस्पिटलमध्ये 200 लिटर ऑक्सिजन टॅंक उपलब्ध व्हावा

हॉस्पिटलमध्ये 200 लिटर ऑक्सिजन टॅंक उपलब्ध व्हावा

नाशिक । प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. ते बघता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये शक्य आहे तेथे 200 लिटर डूरा लिक्विड ऑक्सिजन टॅन्क बसवावेत. ज्यामुळे ऑक्सिजन वारंवार रिफिलिंगची मात्रा कमी होऊन ऑक्सिजनची उपलब्धता होईल अशी मागणि नगरसेविका प्रा.डाॅ.वर्षा भालेराव यांनी जिल्हाप्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे...

करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आॅक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मागिल आठवड्यात एका रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने त्या रुग्णालयातील रुग्णांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला. त्या रुग्णांना हलविण्यासाठी, दुसऱ्या रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी सर्वच यंत्रणेची तारांबळ उडाली.

करोना रुग्णांना बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने मलाही रोजच असे अनुभव येत आहे.

रुग्णालयात ऑक्सिजन संपण्याच्या प्रकारामुळे अनेक हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक असून ऑक्सिजनचे रुग्ण दाखल करण्यास नकार देत आहे. ऑक्सिजन संपला किंवा वेळेवर उपलब्ध झाला नाही तर.ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे.

सध्या ऑक्सिजन सप्लायर त्यांच्या गाडीमध्ये हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सप्लाय करीत आहे. तो तसाच ठेऊन ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये शक्य आहे तेथे 200 लिटर डूरा लिक्विड ऑक्सिजन टॅन्क बसवावेत.

ज्यामुळे ऑक्सिजन वारंवार रिफिलिंगची मात्रा कमी होईल व ऑक्सिजनची उपलब्धता तेथील मीटर वर तात्काळ कळेल. वारंवार शिफ्टिंग, ट्रान्सपोर्ट खर्च व वेळ वाचेल. ऑक्सिजन गळती थांबवणे शक्य होईल असे निवेदनात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com