जिल्ह्यात आढळले २० करोना पॉझिटिव्ह

करोना
करोना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात २० नवे करोनाबाधित रुग्ण (Corona Patients) आढळले आहेत...

सध्या एकूण १७१ रुग्ण करोनावर (Corona) उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात नाशिक मनपा (Nashik NMC) क्षेत्रात ०८ रुग्ण तर नाशिक ग्रामीण (Nashik Rural) क्षेत्रात १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मालेगाव (Malegaon) क्षेत्रात आज एकही रुग्ण आढळला नाही. आज जिल्हाबाह्य नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच करोनाने (Corona) एकही मृत्यू झाला नाही.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ९०४ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आज ३३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com