जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ९८४ रुग्णांना डिस्चार्ज

२ हजार २०४ रुग्णांवर उपचार सुरू
करोना
करोना

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ९८४ करोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार २०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९१, चांदवड ०७, सिन्नर ८४, दिंडोरी ३६, निफाड ७०, देवळा १९, नांदगांव ३८,येवला ६०, त्र्यंबकेश्वर २७, पेठ ०५, बागलाण २३, कळवण ०७, इगतपुरी ३६, मालेगांव ग्रामीण २८ असे एकूण ५३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून सुरगाणा, तालुक्यात एकही करोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५०८ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३४ तर जिल्ह्याबाहेरील ३१ असे एकूण २ हजार २०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ५ हजार ४६५ रुग्ण आढळून आले आहेत.

*मृत्यु :*

नाशिक ग्रामीण ५६ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १३२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७६ व जिल्हा बाहेरील १३ अशा एकूण २७७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

*लक्षणीय :*

◼️ ५ हजार ४६५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ हजार ९८४ रुग्णपुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार २०४ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️ सुरगाणा तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण नाही

*(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com