नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या २ हजार १८५ उमेदवारांना नियुक्त्या द्या!

मराठा आरक्षण स्थगितीपूर्वी झाली होती निवड; छावा क्रांतिवीर संघटनेची मागणी
नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या २ हजार १८५ उमेदवारांना नियुक्त्या द्या!

सातपूर | प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये दि . ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पुर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया ह्या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख केला आहे. तेव्हा त्याआधारे आता कुठलाही विलंब न करता राज्यसेवा परीक्षेसह सर्व विभागांतील भरतीप्रक्रियांतील अंतिम निवड यादीतील २ हजार १८५ उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या द्यावयात. अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली...

राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात , पुर्व परीक्षा , मुख्य परीक्षा , मुलाखत , अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना पुर्ण झाले आहेत . याचप्रमाणे विविध विभागांच्या भरतीप्रक्रियाही ९ सप्टेंबर २०२० पुर्वीच पुर्ण झाल्या आहेत.

परंतू शासनाने कोव्हिडच्या कारणास्तव नियुक्ती पत्रक दिले नव्हते. कोव्हिडच्या कारणामुळे राज्यसेवा मुख्य परीत्रक्षेचा अंतिम निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उशीरा जाहीर केला.

तरीही खरंतर या नियुक्त्या ऑगस्ट महिन्या मध्येच होणे अपेक्षित होते. परंतू, शासनाने कोव्हिडच्या कारणास्तव नियुक्त्या थांबवून ठेवल्या होत्या. दुसऱ्या बाजूला शासनाने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण खटल्यामध्ये वित्त विभागाचा ४ मे २०२० चा एक शासननिर्णय (GR ) सादर केला होता. ज्यानुसार शासनाने कोव्हिडच्या कारणास्तव काही विभाग वगळता नव्या शासकीय नोकरभरतीवर तात्पुरती बंदी घातली होती.

हा शासननिर्णय शासनाने न्यायालयात सादर करून आम्ही कुठलीही नवी नोकरभरती करणार नाही असे आश्वासन न्यायालयात दिले परंतू त्याचवेळी सुरू असलेल्या नोकरभरतीचा तपशील मात्र शासनाने न्यायालयात सादर केला नाही .

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला दिलेल्या स्थगितीपुर्वीच म्हणजे ९ सप्टेंबर २०२० पुर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाने निवड झालेल्या सर्वच २१८५ उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्त्या देणे गरजेचे आहे.

दि . ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये दि . ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पुर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया ह्या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख केला आहे.

तेव्हा त्याआधारे आता कुठलाही विलंब न करता राज्यसेवा परीक्षेसह सर्व विभागांतील भरतीप्रक्रियांतील अंतिम निवड यादीतील उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com