नाशकात 2 लाख 27 हजार करोना चाचण्या

आरटीपीसीआर चाचण्या 1 लाख 17 हजार
corona test
corona test

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक शहरात गेल्या 6 एप्रिलला पहिला करोना रुग्ण सापडला असला तरी नंतर जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर खर्‍या अर्थाने करोना संक्रमणास प्रारंभ झाला.

शहरातील संशयित करोना रुग्णांच्या घश्यातील स्त्रावाचा नमुना घेऊन प्रारंभी पुणे येथील शासकीय लॅबमध्ये आरटीपीसीआर, ट्र्यूनेट व अँटिजेन रॅपीड टेस्ट अशा करोना चाचण्या करण्यास प्रारंभ झाला.

तेव्हापासून आत्तापर्यंत महापालिका क्षेत्रातील संशयितांच्या 2 लाख 27 हजार 425 स्वॅब नमुन्याची चाचणी करण्यात आली. यात 59 हजार 311 अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात 1 लाख 17 हजार 961 आरटीपीसीआर चाचण्याचा समावेश आहे.

नाशिक शहरात जून - जुलै महिन्यात खर्‍या अर्थाने करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले होते. या दरम्यान प्रतिदिन 150 - 200 असे नवीन करोना रुग्ण समोर आले. नंतर ऑगस्ट महिन्यात प्रतिदिन 400 ते 500 नवीन करोना रुग्ण समोर आले होते.

ही नवीन रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून आरटीपीसीआर चाचण्या 100 वरुन 250 पर्यंत नेण्यात आल्या होत्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात नवीन रुग्णांचा आकडा 800 ते 1 हजारांवर गेल्यानंतर महापालिकेकडून दररोज चाचण्यांचा आकडा वाढविला होता. याच दरम्यान मोठ्या प्रमाणात अँटिजेन चाचण्या करण्यात येऊन संक्रमण रोकण्याचे काम करण्यात आले.

याच दरम्यान खासगी लॅबमार्फत महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआर चाचण्या करून घेतल्या. अशाप्रकारे साडेचार पाच महिन्यात महापालिकेकडून शासनाच्या व खासगी लॅबमधून आरटीपीसीआर चाचण्यासाठी 1 लाख 17 हजार इतके स्वॅब पाठविण्यात आल्यानंतर यातील 43 हजार 657 नमुने पॉझिटिव्ह आले होते.

अशाच प्रकारे शहरात 1 लाख 8 हजार 817 अँटिजेन रॅपीड चाचण्या करण्यात आल्यानंतर यातून 15 हजार 654 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. अशाप्रकारे एप्रिल ते 18 ऑक्टोबर दरम्यान आरटीपीसीआर, अँटिजेन व ट्र्युनेट अशा एकूण 2 लाख 27 हजार 425 चाचण्या करण्यात आल्यानंतर यात 59 हजार 311 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

नाशिक महापालिका क्षेत्रातील चाचण्याची स्थिती

प्रकार एकूण स्वॅब पॉझिटिव्ह पॉझि. अहवाल टक्केवारी

आरटीपीसीआर 1,17,961 43,657 44.43

अँटिजेन रॅपीड 1,08,817 15,654 14.39

ट्र्युनेट 875 315 40.11

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com