१९९२ साली वॅगन झाले होते गायब; पैसे ठेवायला जागा नसल्याने पाच लाख फेकले रस्त्याच्या कडेला

१९९२ साली वॅगन झाले होते गायब; पैसे ठेवायला जागा नसल्याने पाच लाख फेकले रस्त्याच्या कडेला

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड (Nashikroad) येथील करन्सी नोट प्रेस (Currency Note Press) मधून पाच लाख रुपये लंपास झाल्याची घटना घडली. कडेकोट बंदोबस्तात नोटछपाई (Note printing) सुरु असते. असे असतानाही इतकी मोठी रक्कम गायब झाल्याचा प्रकार पुढे आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे...

500 रुपये मूल्य असलेल्या नोटांचे 10 बंडल गायब झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार उघडकीस आला आहे.

हा प्रकार दोन आठवड्यापूर्वी उघडकीस आला होता. याबबत पोलिसांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही. करन्सी नोट प्रेस प्रशासन या प्रकाराची विभागांतर्गत गोपनीय चौकशी करत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, येथीलच आयएसपी (इंडिया सिक्युरिटी प्रेस) येथून नोटांचे वॅगन पॅक केले जायचे. हे वॅगन देशभरात पुढे पाठवले जायचे. येथील १९९२ मध्ये जे वॅगन पाठवले जात होते त्यातील एक वॅगनच गायब झाले होते. ज्यांनी हे वॅगन गायब केले होते त्यांना पैसे ठेवायला जागा नव्हती म्हणून पाच लाखांची रक्कम रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना घडली होती.

याप्रकरणात कर्मचाऱ्यांची चौकशी झाली होती. यादरम्यान, नोटांचे नंबर शोधण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र ते शोधण्यात यश आले नाही. अजूनही या गुन्ह्याची उकल झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून कळते.

२०१८ मध्ये देवास येथील नोटप्रेसमध्ये एका अधिकाऱ्यालाच खराब, टाकाऊ नोटांमधुन छापलेल्या नव्या कोऱ्या नोटा घेऊन जातांना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे प्रकरण उघडकीला आले होते. त्यात तो अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आल्याने या प्रकरणा सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

प्रेसमध्ये अनेक कामे ठेकेदारी पद्धतीने सुरु असल्याने बाहेरील व्यक्तींचाही वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एप्रिल महिन्यात कामगारांना इन्सेंटिव्ह दिला आणि मे महिन्यात तो कापुन घेतला, जून महिन्यात जादा काम करूनही कामगारांना इन्सेंटिव्ह मिळाला नाही त्यामुळेही कामगारांत असंतोष धुमसत आहे त्यात शोकॉज नोटीसांची भर पडलेली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com