करोनामुक्तांचा आकडा दिलासादायक; दिवसभरात १९२५ पॉझिटिव्ह

करोनामुक्तांचा आकडा दिलासादायक; दिवसभरात १९२५ पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १ हजार ९२५ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले. तर ८१४ रूग्णांनी करोनावर मात केली...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १ हजार ९२५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात (Nashik City) १३६८, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) विभागात ४२८, मालेगाव (Malegaon) मनपा विभागात ४७ तर, जिल्हाबाह्य ८२ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज एकही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७६६ इतकी आहे.

करोना रुग्णांचा आलेख वाढत असल्याने नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. करोना त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.