कॅन्टोन्मेंट मतदार यादीतून वगळली १९ हजार नावे

कॅन्टोन्मेंट मतदार यादीतून वगळली १९ हजार नावे

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

जानेवारी २०२१ मध्ये मुदत संपलेल्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डावर (Deolali Cantonment Board) सद्या व्हॅरिड बोर्ड असून प्रशासनाने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानुसार १ जुलै रोजी जाहीर केलेल्या मतदार यादीतून (Voter list) २०१४ च्या तुलनेत तब्बल १९ हजार ५२ नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे...

१९२४ मध्ये कॅन्टोन्मेंट कायदा तर १९४५ मध्ये कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा (Cantonment Election Act) अस्तित्वात आला. त्यात २००७ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. सध्या याच कायद्याच्या चौकटीत देशभरात कॅन्टोन्मेंट निवडणूक घेतली जाते. यातील तरतुदीनुसार प्रतिवर्षी जूनमध्ये मतदार नोंदणी करून १ जुलै रोजी प्रसिध्द केली जाते.

तसेच २० जुलैपर्यंत जाहीर झालेल्या यादीवर हरकत घेणे, नावांची नोंदणी करणे ही प्रकिया राबविण्यात येऊन त्यानंतर बोर्ड अध्यक्षांच्या उपस्थितीत हरकतीवर सुनावणी होऊन १५ सप्टेंबर रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येते. २०१४ मध्ये झालेल्या देवळाली कॅन्टोन्मेंट निवडणूकीसाठी सर्व आठ वॉर्डमध्ये एकूण मतदार संख्या ३८ हजार २८० होती.

७ वर्षाने त्यात भर पडणे आवश्यक असताना त्यात घट होऊन ती सर्व आठ वॉर्डासाठी १९ हजार २२८ झाली असल्याने तब्बल १९ हजार ५२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने २०१६ मध्ये दिलेल्या निर्णयामुळे ज्या नागरिकांचा घर बांधणीचा आराखडा मंजूर करण्यात आलेला नाही त्यांची नावे यंदा वगळण्यात आली आहेत.

याचा सर्वाधिक फटका वॉर्ड क्रमांक ७ ला बसला आहे. २०१४ मध्ये या वार्डातील मतदार संख्या ७ हजार ५० होती. आता ती ३३४ झाली आहे, तर वॉर्ड क्रमांक ३ मध्ये २०१४ मध्ये ३ हजार ६९६ असलेली संख्या ३ हजार ८४२ झाली आहे, निवडणूक केव्हा होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत मतदार यादी बनवून निवणुकीची तयारी सुरू केली आहे.

नवा कायदा येणार

केंद्र सरकारने (Central Government) देशभरात एकच निवडणूक कायदा असावा यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी संसद अधिवेशनात याबाबत चर्चा होऊन नवा कायदा अस्तित्वात आल्यास जुन्या कायद्याच्या तरतूद रद्द ठरू शकतात.

सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा मतदार यादीसाठी मोठा अडचणींचा ठरला आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा (Voting) अधिकार असताना कॅन्टोन्मेंटमध्ये तांत्रिक मुद्यावर तो नाकारला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com