वीज कोसळून १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

शिदवाडी येथील घटना
वीज कोसळून १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी गावातील १९ वर्षीय युवकावर वीज कोसळल्याने तो जागीच ठार झाला.

रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या घटनेने शिदवाडी येथे शोककळा पसरली आहे. दौंडत शिवारात ज्योती कंपनीच्या जवळ दारणा नदी भागात ही घटना घडली.

युवकावर अचानक वीज पडल्याचे समजताच पंचायत समितीचे माजी उपसभापती रघुनाथ तोकडे यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना माहिती दिली. वीज पडल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबाला शासनाने तात्काळ अर्थसहाय्य करावे अशी मागणी खैरगावचे सरपंच अँड. मारुती आघाण यांनी केली आहे.

अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी गावातील अहिलू देवराम शिद हा १९ वर्षीय युवक दौंडत शिवारातील ज्योती कंपनीजवळील दारणा नदी भागात काही कामानिमित्त गेला होता. त्याच्यासोबत त्याचे आजोबा लहु बहिरू शिद हे होते. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वारा आणि गारपीट सुरू झाली. यावेळी विजेच्या कडकडाट सुरू होता. त्याचवेळी अचानक अहिलू शिद याच्यावर अचानक वीज कोसळली. यामुळे तो अतिशय गंभीर जखमी झाला.

ह्या घटनेबाबत समजताच पंचायत समितीचे माजी उपसभापती रघुनाथ तोकडे यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना माहिती दिली. गंभीर जखमी अहिलू शिद याला घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेतांना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. यामुळे शिदवाडी भागात शोककळा पसरली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com