जिल्ह्यासाठी १९ हजार पाचशे डोस उपलब्ध

आजपासून सर्वत्र लसीकरण पुर्ववत
जिल्ह्यासाठी १९ हजार पाचशे डोस उपलब्ध

नाशिक । Nashik

जिल्ह्यासाठी शासनाकडून रविवारी 19 हजार 500 कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. यामुळे बंद पडलेले लसीकरण सोमवारपासून पुर्ववत सुरू होईल असे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

नाशिक शहरासह जिल्हाभरात गेली 15 दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा मोठा तुटवडा अ आहे. शनिवारी दिवसभरात संपुर्ण जिल्ह्यात 225 पैकी केवळ 16 केंद्रांवर दोन्ही मिळून केवळ 816 जणांनाच डोस देण्यात आले.

जिल्ह्यात एकिकडे कोरोना अटोक्यात येत असतानाच दुसरीकडे लसीकरणासाठी कोरोना प्रतिबंधक लसच उपलब्ध होत नसल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे. जो साठा जिल्ह्याला उपलब्ध होत आहे. त्यामध्ये दुसर्‍या डोसला प्राधान्य देण्यात आले असून 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण पुर्णत बंद आहे. असे असतानाही पहिला डोस अल्प तर दुसरा डोसही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. यामुळे संपुर्ण जिल्ह्यात लसीकरण कासवगतीने सुरू आहे.

शहर तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 86 हजार 881 लसींचे दोन्ही मिळून डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने पुन्हा एकदा लसीकरणावर याचा परिणाम झाला आहे. गेली महिनाभरापासून जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने जिल्ह्यातील 225 पैकी 209 लसीकरण केंद्र बंद होती.

नाशिक महापालिकेच्या 1 तर जिल्हाभरातील 15 अशा एकुण 16 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. रविवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान रविवारी दुपारी जिल्ह्यासाठी 19 हजार 500 लसीचे डोस उपलब्ध झाल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com