हॉकर्स झोन मध्ये उभ्या राहिल्या 19 नवीन टपऱ्या
हॉकर्स झोन मध्ये उभ्या राहिल्या 19 नवीन टपऱ्या
नाशिक

हॉकर्स झोन मध्ये उभ्या राहिल्या 19 नवीन टपऱ्या

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

शहरातील वाढते अतिक्रमण लक्षात घेत रस्ते मोकळे करण्याच्या दृष्टीने रस्त्यावरील अतिक्रमणीत टपऱ्याना एका जागेवर आणून व्यवसाय करणे अपेक्षित होते. सातपूर परिसरात सक्षम पणे सुरु झालेल्या चार हॉकर्स झोन मध्ये व्यावसायिकांच्या स्थापने नंतर तेथील बाजारपेठेला गती मिळू लागली आहे.

परिणामी या परिसरात दुकान थाटण्यासाठी नोंदणी न केलेल्या व्यवसायिकांनी शिल्लक जागांवर आपला हक्क सांगत त्याठिकाणी बांबूच्या चौकटी मांडून ठेवले आहे.

मनपा प्रशासनाने केलेल्या एका सर्वेक्षणातून एकोणावीस अतिक्रमण जागा निदर्शनात आले आहे. या व्यतिरिक्तही औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात तर यांची अतिक्रमण दिसू लागले आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या कामकाजाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com