बापरे! नाशकात 'इतके' तडीपार

बापरे! नाशकात 'इतके' तडीपार

नाशिक | Nashik

सण उत्सव शांततेत साजरे व्हावे या हेतूने शहर पोलिसांनी (Nashik city Police) १९ सराईत गुन्हेगारांना (Sarait criminals) २० ते २४ जुलै या कालावधीसाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहेत.

बकरी ईद (Bakri Eid) असल्याने ज्या गुन्हेगारांवर प्राणी सरंक्षण कायद्यानुसार तसेच इतर सण उत्सवाच्या कालावधीत २ किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या भद्रकालीतील (Bhadrakali) १३ व मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील (Mumbainaka Police Station) सहा अशा १९ गुन्हेगारांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलमान्वये कारवाई (Police Action) करण्यात आली आहे.

त्यानुसार या गुन्हेगारांना मंगळवारी (दि.२०) रात्री अकरापासून शनिवारी (दि.२४) रात्री बारापर्यंत शहर पोलिस आयुक्तालयाच्या (Nashik CP Office) हद्दीतून तडीपार करण्यात आले आहेे.

पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना यांनी ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com