
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात दिवसभरात ८६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १८८ रुग्णांनी करोनावर (Corona) मात केली...
जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ८६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ३४ रुग्ण, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) क्षेत्रातील ४९ रुग्ण, मालेगाव (Malegaon) क्षेत्रातील ०१ रुग्ण तर जिल्हाबाह्य ०२ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ९०२ इतकी आहे. आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण ६०७ आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी करोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.