मिशन झिरो उपक्रमांतर्गत ३ दिवसात १८३२ अँटीजेन चाचण्या

मिशन झिरो उपक्रमांतर्गत ३ दिवसात १८३२ अँटीजेन चाचण्या
मिशन झिरो नाशिक

नाशिक | Nashik

मिशन झिरो व मिशन लसीकरण हे अभियान नाशिक महानगर पालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स या संस्थां द्वारे पंचवटी विभागात सुरु करण्यात आल्यानंतर तिस-या दिवशी एकूण ८७७ अँटीजेन चाचण्या होऊन ०५ पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यात यश आले तर ८७२ निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.

याप्रमाणे मिशन सुरु झाल्या पासून तीन दिवसात १८३२ अँटीजेन चाचण्या होऊन २० पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यात यश आले तर १८१२ निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. आता फक्त ४५+ वयोगटातील दुसरा डोस घेण्यास पात्र असलेल्या नागरिकांनाच लस दिली जात आहे.

इंदिरा गांधी रुग्णालय, मायको दवाखाना फुले नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्ह्सरूळ येथे हे अभियान सुरु झाले असून लवकरच नाशिकच्या सहाही विभागातील सर्व लसीकरण केंद्रांजवळ महानगर पालिकेच्या वतीने व या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मिशन झिरो हे अभियान सुरु होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com