जुने नाशकात कुर्बानीसाठी तब्बल १८० किलोचा बोकड

ईद सणाची तयारी
ईद
ईद

नाशिक | फारूक पठाण

 दोन आठवड्यावर येऊन ठेपलेल्या पवित्र ईद-उल-अझहा अर्थात बकरी ईद सणाची तयारी शहर परिसरातील मुस्लिम बांधवांनी सुरू केली आहे. दरम्यान कोकणीपुरा भागात राहणाऱ्या एका कोकणी परिवाराचा तब्बल एकशे ऐंशी किलोचा बोकड कुर्बानीसाठी सज्ज झाला आहे. घरातच काही बोकड कुर्बानीसाठी तयार करण्यात आले आहेत. १ ऑगस्ट रोजी पवित्र ईदचा सण साजरा केला जाणार आहे.

इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इब्राहिम अलैहसलाम व हजरत इस्माईल आलैहसलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याग व कुर्बानीची शिकवण देणारा पवित्र 'ईद उल अजहा' अर्थात बकरा ईदचा सण मुस्लिम समाज साजरा करतो.

सण आता अवघ्या दोन आठवड्यावर येऊन ठेपला आहे, यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदची जोरदार तयारी सुरू केला आहे. शहरात कुर्बानीसाठी लागणाऱ्या विविध जातीचे बोकड यांची आवक वाढली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन बुकिंग व विक्री केली जात आहे. पहिल्यांदा करोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदचा सण येत आहे. मागील पाच महिन्यात मुस्लिम बांधवांनी सर्व प्रकारचे सण घरातच विशेष प्रार्थना करून साजरी केल्या तर आता बकरी ईदचा सण देखील आला आहे. प्रशासनाने परवानगी दिली तर ईदची सामुदायिक नमाज ईदगाह मैदानावर तसेच मशिदींमध्ये पठण होणार आहे, अन्यथा बकरी ईद देखील मुस्लिम बांधव घरीच साजरी करतील.

दरम्यान ईदसाठी लागणाऱ्या विविध जातीचे व प्रकारचे बोकड बाजारात उपलब्ध होत आहे, त्याचप्रमाणे ऑनलाईन बुकिंग देखील यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे . जुने नाशिकच्या कोकणीपूरा भागात राहणाऱ्या एका कोकणी परिवाराने  काही बोकडे कुर्बानीसाठी तयार केले आहेत. यातील काही बोकडांचा वजन तब्बल 180 किलोपर्यंत आहे. बकरी ईदच्या तीन दिवसात सर्वेसर्वा अल्लाहताआलाच्या मार्गात जनावरांची कुर्बानी देण्यात येते, यामुळे बाजारात विविध जातीचे व आकाराचे बोकड आले आहेत.

सध्या करोनाचे संकट असल्यामुळे बाजार जरी भरत नसले तरी ऑनलाईन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बकऱ्यांची खरेदी-विक्री सुरू झाली आहेत.  ईदची विशेष नमाज पठण झाल्यानंतर कुर्बानीचा सिलसिला सुरू होतो व ते एकुण 3 दिवस चालतो. दरम्यान काही धार्मिक संस्थांनी देखील कुर्बानीची सोय केली आहे. यामध्ये नुरी मिशन चॅरिटेबल ट्रस्ट, फैझान ए ओलिया मशिद ट्रस्ट, इस्लामिक रिसर्च सेंटर आदींचा समावेश आहे. 

सोजत व राजस्थानी या जातीच्या बोकडांना तयार करतांना परिवाराने विशेषलक्ष दिले आहे. बोकडांना रोज विशेष प्रकारचे जेवण नियमित देण्यात येत असते, रोज रात्री त्यांना प्रत्येकी दोन लिटर दूध तसेच दिवसभरात ड्रायफूटसह जव, गहू, सोयाबीन, मकई, घीसह इतर खाद्यपदार्थ देेेण्यात येते. अशी माहिती फखर कोकणी यांनी 'देशदूत' शी बोलताना दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com