सुकन्या योजनेंतर्गत 18 अनाथ मुली दत्तक

सुकन्या योजनेंतर्गत 18 अनाथ मुली दत्तक

लोहणेर । वार्ताहर Lohaner

करोना (corona) प्रादुर्भावाने अथवा अपघातामुळे (accident) अचानक पालकाचे छत्र हरवल्याने अनाथ (Orphan) झालेल्या सुमारे अठरा मुलींना ठेंगोडा ग्रामपंचायतीने सुकन्या योजनेंतर्गत (Sukanya Yojana) दत्तक (Adopted) घेतले आहे.

या मुलींना बचत खाते पुस्तक वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प. माजी सभापती यशवंत पाटील हे होते. जि.प. सदस्या मिना मोरे, पं.स. उपसभापती ज्योती अहिरे, बागलाण तहसीलदार जितेंद्र इंगळे (Baglan Tehsildar Jitendra Ingle), सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपुरी (Assistant Group Development Officer Hemant Kumar Kathepuri), पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई (Sub-Inspector of Police Rahul Gawai), बी.पी.एम. थोरात, सरपंच चिंधाबाई पगारे, उपसरपंच नारायण निकम आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.

ठेंगोडा गावात करोना काळात अथवा अपघातामुळे पालक गमावल्याने अनाथ झालेल्या व अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या अठरा मुलींना ग्रामपंचयतीतर्फे दत्तक घेण्यात आले. शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सुकन्या योजने अंतर्गत या मुलीचे पोस्ट बचत बँकेत खाते (Post Savings Bank Account) उघडून दरमहा त्यांच्या खात्यात ग्रामपंचायतच्या महिला बालकल्याण खात्यातील दहा टक्के निधीतून (fund) वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत या मुलींच्या खात्यावर दोनशे रुपये महिना याप्रमाणे निधी ग्रामपंचायतीमार्फत जमा केला जाणार आहे.

यावेळी मार्गदर्शन करतांना तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक करत हा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषण करतांना यशवंत पाटील यांनी सदर योजनेची अंमललबजावणी करणार्‍या ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांसह सदस्य व ग्रामसेवकांचे अभिनंदन केले.

यावेळी दिलीप अहिरे, विस्तार अधिकारी नितीन देशमुख, आरोग्यसेवक रामचंद्र हिरे, राहुल गवई, ग्रामसेवक पंकज पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रा.पं. सदस्य भरत धनवटे, रविंद्र मोरे, दौलत पगारे, तुळशीदास शिंदे, अंजना मोरे, भारती वाघ, विमल अहिरे, लता पवार, सुनील निरभवणे, तलाठी कापडणीस यांच्यासह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना चौधरी यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com