48 गावांच्या विकासासाठी 18 कोटी मंजूर

48 गावांच्या विकासासाठी 18 कोटी मंजूर
USER

मुंजवाड । वार्ताहर Mujvada

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) तब्बल 48 गावातील दलित व मातंग समाजाच्या (Dalit and Matang community) वस्तींमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक विकास योजनेंतर्गत (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Social Development Schemes) 18 कोटी रूपयांचा निधी मंजूर (Funding approved) झाला आहे. पंधरा टक्के निधी देखील वितरित झाला असल्याने या कामांना लगेच प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांनी दिली.

बागलाण तालुक्यातील अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी तसेच मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सुचविलेल्या कामांना शासनस्तरावर मान्यता मिळाली असल्याची माहिती देत आ. बोरसे पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत 18 कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजूरी दिली आहे.

या योजनेंतर्गत नामपुर (Nampur), करंजाड, द्याने, निताणे या गावांना बहूउद्देशीय कार्यालय बांधणे, आखतवाडे, गोराणे, टेंभे खालचे, उत्राणे, द्याने, जायखेडा, बिजोरसे, निताणे, खिरमाणी दलित वस्तीना संरक्षण भिंत बांधणे, लखमापुर (Lakhamapur), ब्राम्हणगाव (Bramhangaon) बुद्धविहार (Buddha Vihar) बांधणे व जायखेडा येथील मातंग वस्तीत सभामंडप बांधणे, लखमापुर, दसवेल, अंतापूर, ताहाराबाद, जुनी शेमळी नवे निरपूर, वटार, अजमिर सौंदाणे, पिंपळकोठे, चौंधाणे, विरगाव, टेंभे वरचे, श्रीपूरवडे येथे रस्ता काँक्रिटीकरण (Road concreting) करणे तसेच जायखेडा,

उत्राणे येथे रस्ता सुधारणा, सोमपुर, नामपुर, निताने, श्रीपुरवडे, नवे निरपूर, पिंपळकोठे, जायखेडा, इजमाणे, नामपुर, अंबासन, तळवाडे भामेर, बोढरी, खिरमणी, वटार, भाक्षी, करंजाड, फोपिर, वनोली, किकवारी,चौगाव, विंचुरे, बिलपुरी येथे सौर पथदिप बसविणे तसेच सोमपुर, नामपुर, निताणे, श्रीपुरवडे, द्याने, बिलपुरी. वाडीपिसोळ, जायखेडा, टेंभे वरचे, टेंभे खालचे, तळवाडे भामेर,

इजमाने, बहिराणे, बिजोरसे, खीरमानी, फोपिर, नांदिन, काकडगाव, नळकस, कोटबेल, बोढरी, दरेगाव या गावातील दलित वस्तीत इलेक्ट्रिक हायमास्ट व पथदिप बसविणे आदी कामे होणार असून तब्बल 22 गावांमध्ये सोलर वॉटर हिटर बसविले जाणार असल्याने दलित वस्तींना गरम पाणी मिळणार असल्याचे आ. बोरसे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.