जिल्ह्यात २४ तासात 'इतके' पॉझिटिव्ह रूग्ण

जिल्ह्यात 85 हजार 307 रूग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात २४ तासात 'इतके' पॉझिटिव्ह रूग्ण

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात प्रादुर्भाव कमी होत असून मागील चोवीस तासात केवळ 171 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा दुप्पट 386 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

यामुळे करोनावर मात करणारांचा आकडा 85 हजार 307 वर पोहचला आहे. हे प्रमाण 92.30 इतके आहे.

मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येणारांची संख्या घटत चालली आहे. तर करोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात केवळ 171 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 125 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 61 हजार 220 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील केवळ 39 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 26 हजार 399 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 5 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर जिल्हाबाह्य दोन आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 4 हजार 111 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 697 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 386 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 85 हजार 307 झाला आहे.

करोनामृत्यूमध्येही मोठी घट झाली असून दिवसभरात 12 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहरातील 3, ग्रामिण भागातील 8 व मालेगाव येथील 1 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 655 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा घटत चालला असून आज दिवसभरात 676 रूग्ण दाखल झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com