अग्निपथ धोरणाचा फटका 17 रेल्वे रद्द; प्रवाशी त्रस्त
मनमाड । प्रतिनिधी | Manmad
अग्निपथ योजनेच्या (Agneepath Yojana) नवीन धोरणाविरोधात ठिकठिकाणी होणार्या आंदोलनांचा (agitation) फटका रेल्वेला (railway) बसला असून मनमाडमार्गे (manmad) जाणार्या 17 रेल्वेगाड्या रद्द (Trains canceled) करण्यात आल्या आहेत.
गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, आंदोलन (agitation) करणार्या तरुणांनी काही ठिकाणी रेल्वेगाड्यांसह रेल्वेस्थानकांनाही लक्ष्य करून जाळपोळ (Arson) केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मनमाड रेल्वेस्थानकावर (Manmad Railway Station) पोलीस (police) व आरपीएफ (RPF) जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अग्निपथ योजनेच्या (Agneepath Yojana) माध्यमातून भारतीय लष्करात भरती (Recruitment in Indian Army) केली जाते. मात्र, या योजनेतील जुने धोरण बदलून नवीन धोरण जाहीर करण्यात आले असून ते अन्यायकारक असल्याचा आरोप करीत तरुणांनी आंदोलन सुरु केले आहे. बिहार (bihar), उत्तरप्रदेशसह (Uttar Pradesh) इतर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्याचा फटका इतर घटकांसोबत रेल्वेला मोठ्या प्रमाणात बसत आहे.
मनमाडमार्गे जाणार्या व येणार्या 17 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेसूत्रांनी दिली. त्यात साईनगर-सिकंदराबाद एक्स्प्रेस (Sainagar-Secunderabad Express), मनमाड-सिकंदराबाद एक्स्प्रेस (Manmad-Secunderabad Express), पवन एक्स्प्रेस, पाटलीपुत्र एक्स्प्रेस, दानापूर-पुणे एक्स्प्रेस, जनता एक्सप्रेस यासह मुंबई (mumbai), बिहार (bihar) व उत्तर भारतात जाणार्या गाड्यांचा समावेश आहे.