१७ लाख विद्यार्थी, साडेआठ लाख जागा !

१७ लाख विद्यार्थी, साडेआठ लाख जागा !

कस लागणार : प्रवेशासाठी उडणार गाेंधळ

नाशिक | Nashik

कराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षाच रद्द झाल्याने राज्य मंडळाची परीक्षा उत्तीर्ण हाेणारे यंदा १६ लाख विद्यार्थी आणि इतर मंडळाचे विद्यार्थी असे जवळपास तब्बल १७ लाख विद्यार्थी पुढच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेत सहभागी हाेतील. त्यातच आयटीआय, अकरावी, पॉलिटेक्निक मिळून केवळ साडेआठ लाख जागा असल्याने प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.

मागील काही वर्षांपासून अकरावीच्या हजाराे, लाखो जागा मार्चपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहूनही रिक्त राहत आहेत. त्यामुळे अकरावी किंवा तंत्रशिक्षण पदविका यांच्या प्रवेशासंदर्भात अडचणी निर्माण होणार नाहीत. मात्र, नामवंत महाविद्यालयातील प्रवेशासाठीची चढाओढ आणखी तीव्र हाेऊ शकते. गुणच नसतील तर श्रेणीच्या साहाय्याने प्रवेशप्रक्रिया राबविताना गोंधळ उडू शकतो. गुणांचे समानीकरण अवघडच ठरणार आहे.

दरम्यान, अकरावी व इतर प्रवेश कसे आणि कोणत्या निकषांवर करावे लागतील, याबाबत विविध पर्यायांची चाचपणी शिक्षण विभागाकडून होत आहे.

हे असू शकतात पर्याय :

- अंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनाचे निकष बघून राज्यातील मंडळाच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन उत्तीर्ण करून अकरावी प्रवेश गुणांच्या आधारे दिला जाऊ शकतो.

-राज्य मंडळाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचाही पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो, जेणेकरून त्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश दिला जाऊ शकेल.

- नववी आणि दहावी संयुक्त मूल्यमापन करून अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल दिला जाऊ शकतो. याच निकालाच्या आधारावर अकरावीसह इतर प्रवेश प्रक्रियांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

दहावीतील विविध मंडळांची विद्यार्थी संख्या

मंडळ - विद्यार्थी

सीबीएसई - ७०, २४७

आयसीएसई - २२, ६३०

आयबी - २, ७८२

राज्य मंडळ - १६, ९९, ०१९

मागील वर्षी उपलब्ध जागांची संख्या

अकरावी - ५, १९, ३४४

आयटीआय - १, ४५, ०००

डिप्लोमा- १, ०५, ०००

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com