दिंडोरीत 'इतक्या' एकरात होणार लसनिर्मिती प्रकल्प; दीडहजार कोटी गुंतवणूक; अडीच हजार रोजगार

दिंडोरीत 'इतक्या' एकरात होणार लसनिर्मिती प्रकल्प; दीडहजार कोटी गुंतवणूक; अडीच हजार रोजगार
covid vaccination

सातपूर | प्रतिनिधी

रिलायन्स उद्योग समूहातील आघाडीची रिलायन्स लाइफ सायन्स कंपनी जिल्ह्यातील अतिरिक्त दिंडोरी एमआयडीसी क्षेत्रात लसनिर्मिती प्रकल्प सुरू होत आहे. दिंडोरी भागात 161 एकर जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या उद्योगामुळे पहील्या टप्यात सुमारे 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, या माध्यमातून अडीच हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे....

covid vaccination
खुशखबर! दिंडोरीत होणार लशीची निर्मिती

रिलायन्स लाइफ सायन्स कंपनी आरोग्य क्षेत्रात काम करते. प्लाझ्मा प्रोटिन्स यांसह विविध औषध निर्मितीमध्ये या कंपनीचा मोठा सहभाग आहे. सध्या कंपनीचा नवी मुंबईत प्रकल्प असून, लवकरच दिंडोरी येथे गुंतवणूक करण्याचा कंपनीचा निर्णय आहे.

रिलायन्स कंपनीकडून याबाबत चाचपणी सुरू आहे. अद्याप अंतिम स्वरूप आलेले नसले तरी सकारात्मक प्रतिसाद आहे.

नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com