16 गाव जलवाहिनी कामास प्रारंभ; पाणीपुरवठा होणार सुरळीत

16 गाव जलवाहिनी कामास प्रारंभ; पाणीपुरवठा होणार सुरळीत

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

लासलगाव (Lasalgaon), विंचूरसह (vinchur) 16 गावांना वरदान 16 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस (Water Supply Scheme) जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत नूतन पाईपलाईन, पंपिंग मशिनरी (Pipelines, pumping machinery) व इतर कामांसाठी रेट्रोफिटिंग योजनेतून (Retrofitting scheme) नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती.

या योजनेसाठी 17 कोटी 15 लाख रुपयांचा निधी (fund) मंजूर झाल्याने या योजनेचे काम सुरू झाले असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal) यांनी दिली. सदर पाणीपुरवठा (Water supply) सन 2010 पासून कार्यान्वित करण्यात येऊन सदर योजना सन 2012 साली संयुक्त पाणीपुरवठा समितीकडे देखभाल दुरुस्ती व योजना चालवण्यासाठी हस्तांतरीत करण्यात आली होती. सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Regional Water Supply Scheme) या 16 गावांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे.

सदर योजनेची पाईपलाईन जुनी झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजचा सामना करावा लागत असल्याने योजना चालवणे कठीण होते. यासाठी छगन भुजबळ (chagan bhujbal) यांच्या प्रयत्नातून नुकतीच सदर योजनेच्या नूतनीकरणास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर या योजनेच्या कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला असून योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे. लासलगाव (lasalgaon), विंचूरसह (vinchur) 16 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा (16 village regional water supply scheme) मूळ योजना सन 2031 पर्यंत एकूण संकल्पित 99,901 लोकसंख्येकरता मंजूर करण्यात आली आहे.

या योजनेच्या मुख्य 457 मि.मी व्यासाचे एम.एस. पाईप वारण्यात आले आहेत. एकूण लांबीपैकी साधारण 5500 मि. पाईपलाईन जमिनीखालून टाकलेली असल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर नियमित लिकेज होते. त्यामुळे योजनेचा पाणीपुरवठा (Water supply) वारंवार खंडित होत होता. जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) कार्यक्रमामधील रेट्रोफिटिंगअंतर्गत पूरक पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येऊन अंदाजपत्रके व आराखड्यास मंजुरी मिळाली होती. नवीन डीएसआरप्रमाणे (DSR) प्रशासकीय आणि निविदा प्रक्रियेत (tender process) अधिक वेळ गेल्याने या योजनेस पाणीपुरवठा करण्यात अनेक अडचणी सुरू होत्या.

याबाबत भुजबळ यांनी जिल्हास्तरावरून निधी प्राप्त करून तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करण्यात येऊन खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत केला होता. त्यानंतर त्यांच्या सततच्या पाठपुराव्यातून योजनेस कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Regional Water Supply Scheme) यशस्वीरीत्या सुरू राहण्यासाठी या योजनेमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाची तरतूद करण्यात आली असल्याने विजेचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. यामुळे खर्चामध्ये बचत होणार आहे.

या योजनेमध्ये लासलगाव, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, विष्णूनगर, डोंगरगाव, नांदगाव, कोटमगाव, टाकळी विंचूर, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव वीर, ब्राह्मणगाव विंचूर, पिंपळगाव नजिक, निमगाव वाकडा, हनुमाननगर सोळा गावांचा समावेश असून योजनेच्या नूतनीकरणामुळे येथील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com