
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्याची १६ सदस्यीय अनुसूचित जाती समिती (Scheduled Castes Committee) रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर (Nashik Tour) येत आहे...
पहिल्या दिवशी (दि. १०) समितीचे सदस्य हे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व मागासवर्गीय संघटनांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) स्थानिक स्वराज्य संस्थांतील अनुसूचित जाती प्रवर्ग भरती, बढती आरक्षण, अनुशेष, जातपडताळणी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आदी विषयांबाबत आढावा घेतला जाईल.
सोमवारी (दि. ११) महावितरण, कृषी, क्रीडा अधिकारी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम वनविभाग यांचा आढावा घेणार आहेत. मंगळवारी (दि. १२) पोलीस आयुक्त परिवहन विभाग, आरोग्य अधिकारी, उत्पादन शुल्क, औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा घेतला जाणार आहे. या दरम्यान समिती सदस्य तालुक्यांना भेटी देत तेथील कामकाजाची पाहणी करणार आहेत.