दीडशे वाहने मालकांना परत
नाशिक

दीडशे वाहने मालकांना परत

Abhay Puntambekar

पंचवटी । प्रतिनिधी

बेवारस, अपघात आणि चोरीस गेलेल्या दुचाकी चारचाकी वाहनांच्या मालकाचा शोध घेऊन कागदपत्रांची खात्री करत पंचवटी पोलिसांनी सुमारे १५० हुन अधिक वाहने मालकांच्या ताब्यात दिले आहेत .

गेल्या काही दिवसांपुर्वी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पाहणी दौरा केला त्यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या बेवारस, अपघातग्रस्त तसेच चोरीला गेलेली चारचाकी दुचाकी वाहने आहेत मात्र त्यांची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा त्यांचे मुळमालकांचे ठाव ठिकाणा नसल्यामुळे ही वाहने पोलिस ठाण्याच्या आवारातच पडुन आहेत अशा वाहनांच्या मालकाचा शोध घेऊन संबंधित वाहने मुळमालकाच्या ताब्यात देण्याचा आदेश केला.

त्यानंतर पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी पुण्यातील गंगामाता वाहन शोध संस्थेशी संपर्क साधून सदरील काम गंगामाता वाहन शोध संस्थेला देण्यात आले यावेळी या संस्थेच्या सेवकांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून चोरीस गेलेल्या दुचाकी चारचाकी वाहनांची चेसीनंबर इंजीन नंबरवरुन वाहनांच्या मुळमालकाचे नाव तसेच त्यांचा रहाण्याचा पत्ता मिळवुन त्यांच्याशी पत्रव्यवहार करुन त्यांना वाहनांच्या मुळकागदपत्रासह पंचवटी पोलिस ठाण्यात हजर रहाण्याचे कळविण्यात आले. यावेळी सुमारे १५० हुन अधिक वाहने त्यांच्या मुळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com