नाशिक जिल्ह्यातून १५ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात

नाशिकमुळे २४ दिवसात देशाला कोट्यवधींचे परकीय चलन
नाशिक जिल्ह्यातून १५ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात

नाशिक । Nashik

नाशिक जिल्ह्यातील दि. १ ते २४ जानेवारी दरम्यान तब्बल १५ हजार ८६९ मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. यामुळे देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे.

कांद्याचा प्रतिकिलो ४० रुपये दर होताच केंद्र सरकारने १४ सप्टेंबर २०२० रोजी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. तेव्हा नाशिकसह देशातील अन्य व्यापाऱ्यांनी परदेशात पाठविलेला कांदा देशांतर्गत सीमांवर, तसेच मुंबई बंदरावर पडून होता़. निर्यातबंदीनंतर व्यापाºयांवर साठवणुकीचे निर्बंध घातले गेले होते. तसेच, नाशिक जिल्ह्यातील मोठ्या कांदा व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडीही पडल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील ही कांदा कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले. अखेर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे परदेशी व्यापार महासंचालक अमित यादव यांनी कांदा निर्यातबंदी उठविण्याबाबत शासन निर्णय काढला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी लगेचच १ जानेवारीपासून कांदा निर्यात करण्यास प्रारंभ केल्यानंतर रविवार (दि. २४) पर्यंत जिल्ह्यातून १५ हजार ८६९ मेट्रिक टन कांदा मुंबईहून बांगलादेश, कोलंबो, मलेशियासह अन्यत्र निर्यात झाला आहे. निर्यात खुली केल्याचा लाभ उत्पादकांना होत असल्याचे कांदा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. - शहर कंटेनर मेट्रिक टन नाशिक शहर - २१ ६२८.२२६ मुंबई शहर - ३५१ १५०७३.५९६ नाशिक ग्रामीण - ०६ १६८.००० एकूण- ३७८ १५८६९.८२२

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com