
सिन्नर | वार्ताहर | Sinner
येथील पंचाळे शिवारातील (Panchale Shivar) शिंदेवाडी फाट्यावर बाळूमामाच्या मेंढ्यांना (Sheep) स्विफ्ट कारने (Swift Car) धडक दिल्याने पंधरा मेंढ्यांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (दि ११) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मिरगाव येथून शहामार्गे बाळूमामाच्या पालखी क्रमांक १३ मध्ये समावेश असलेल्या २५० मेंढ्या पंचाळे येथे एका भाविकाच्या (devotee) शेतामध्ये बसण्यासाठी येत होत्या.
त्यावेळी शहा-पंचाळे रस्त्याने (Shah-Panchale Road) मेंढ्या प्रवास करत असतांना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शिंदेवाडी फाट्यावर कोळपेवाडी मार्गे येणाऱ्या एका स्विफ्ट कारने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिली. यामध्ये आठ मेंढ्यांचा जागीच तर सात मेंढ्यांचा वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ भाविकांनी काहीकाळ शिंदेवाडी पंचाळे रस्ता रोखून धरला होता. तसेच यासंदर्भात मुसळगाव एमआयडीसी पोलिसांना (Musalgaon MIDC Police) माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत भाविकांचे सांत्वन करत गाडीचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. तर पोलीस पाटील शांताराम कोकाटे, पोलीस हवालदार जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली.