कोरपगाव विलगीकरण सेंटरला १५ ऑक्सीजन सिलेंडर भेट

अभिषेक इंटरप्रायजेस कंपनीची मदत; आमदार खोसकर यांच्या प्रयत्नांना यश
कोरपगाव विलगीकरण सेंटरला १५ ऑक्सीजन सिलेंडर भेट

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव येथील कोरोना सेंटर सुरवातीला विलगीकरणासाठी उपलब्ध करण्यात आले होते.

इगतपुरी गामिण रुग्णालयातील कोविड सेंटर फुल झाले. मात्र कोरोना रूग्णांची तालुक्यात वाढती संख्या पाहता कोविड बाधित रूग्णांना ऑक्सीजनसह बेडची कमतरता भासु लागल्याने उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत असल्याने आमदार हिरामण खोसकर यांनी संबधित अधिकारींकडे या सेंटरमध्ये ऑक्सीजनसह बेड उपलब्ध व्हावे या करीता अथक प्रयत्न केले.

कोरपगाव कोविड सेंटरला ऑक्सीजनची मान्यता मिळाल्या बरोबर सातपुर येथील अभिषेक इंटरप्रायजेस प्रा. ली. कंपनीचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी १५ बेड व १५ ऑक्सीजन सिलेंडर मोफत भेट दिल्याने काही अंशी कोरोना रूग्णांना दिलासा मिळाला आहे. मानवता हिच इश्वरसेवा असल्याची भावना गोरख बोडके यांनी यावेळी व्यक्त केली.

करोनाचे वाढतच चाललेल्या संक्रमणामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थापन बिघडून गेलेले आहे. अस्वस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सातत्याने प्रयत्न करीत आहे. असे असले तरी बेड शिल्लक नसल्यामुळे आरोग्य यंत्रणा ह्या परिस्थितीपुढे हतबल ठरते. अशा बिकट अवस्थेत इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना तातडीने बेड उपलब्ध व्हावे म्हणून आमदार खोसकर यांच्या प्रयत्नाला यश आले.

जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी स्वखर्चाने १५ बेडसह १५ ऑक्सीजन सिलेंडर देत दातृत्वातुन मानवता जोपासली. गोरख बोडके यांच्या कार्याला प्रतिसाद देऊन अनेक दाते रूग्ण सेवेच्या मदतीला सरसावल्याने तालुक्यात हे महत्वपूर्ण सत्कार्य पहावयास मिळते. तालुक्यातच कोरोना रूग्णांना ऑक्सीजन बेड मिळण्यास सुरुवात झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी बोडके यांचे कौतुक केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com