नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला मिळणार १५ कोटींचा बूस्ट

पर्यटनवाढीसाठी होणार विविध कामे
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला मिळणार १५ कोटींचा बूस्ट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात (Nandurmadhyameshwar Bird Sanctuary) पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध कामे केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाकडून (Maharashtra Nature Tourism Board) सुमारे 15 कोटींचा निधी (Fund) मिळ्णार आहे. पर्यटकांसाठी नांदूरमध्यमेश्वर पुढील दिवसात नंदनवन ठरणार आहे...

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाकडून राज्यभरातील पन्नास स्थळांचा सर्व्हे (Survey) करण्यात आला.होता. यात नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य व ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्याची (Tansa Sanctuary) निवड करण्यात आली.

पुढील काळात येथे पक्षी निरीक्षणासाठी मनोरे, पायवाट, ऑफिसेस, बेंचेस, पार्किंग व्यवस्था, स्थानिकांना रोजगार व प्रशिक्षण, पर्यटनासंदर्भातली माहिती, दिशा दर्शक फलक, निसर्ग पर्यटन आदींसह पर्यटनासाठी हातभार लावण्यात येणार आहे.

अंदाजे तीन वर्ष हे काम सुरु राहण्याची शक्यता आहे. यामाध्यमातून नांदूरमध्यमेश्वर टुरिझम अपग्रेड केले जाणार आहे. तसेच पर्यटनाच्या मांजरगाव, कातरगांव, कोठुरे या नव्याने साईट वाढविल्या जाणार आहेत, लवकरच या कामांसाठीचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.

गेल्या काही वर्षापासून नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात असून यात वन्यजीव विभागाला (WildlifeDepartment) यश आल्याचे चित्र आहे. कारण मागील काही दिवसांमध्ये पर्यटकांच्या माध्यमातून महसुलात वाढ होऊ लागली आहे.

बर्ड फेस्टीव्हल आयोजनाचा फायदा अभयारण्याला झाला आहे. ऑक्टोबरपासून विदेशातील विविध दुर्मिळ पक्षांची मांदियाळी येथे दिसून येते. फेब्रुवारी मार्चपर्यंत या पाहुण्यांचा मुक्काम नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात असल्याने पक्षीप्रेमी व पर्यावणप्रेमींसाठी हे चित्र पाहण्याची उत्सुकता दिसून येते.

रामसरचा दर्जा मिळाल्यानंतर नांदूरमध्यमेश्वरचे महत्व कमालीचे वाढले आहे. येथील जैवविविधता टिकविण्यासाठी वन्यजीव विभागाला सतत काम करावे लागणार आहे. त्यादृष्टीने याकडे वन्यजीव विभागाचे अगदी बारीक गोष्टींकडे लक्ष असते.

पुढील कालावधीत येथे पर्यटकांसाठी सर्व सुविधा मिळ्णार असल्याने याचा फायदा वन्यजीव विभागासह स्थानिक नागरिकांना होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com