1451 पिशव्या रक्त संकलनाचा टप्पा पार

1451 पिशव्या रक्त संकलनाचा टप्पा पार

नाशिक । प्रतिनिधी

शिवसेनेतर्फे आतापर्यंत 30 रक्तदान शिबिरे पार पडली. 1451 चा टप्पा पार झालयांने हा शिवसैनिकांसाठी आनंदाचा क्षण आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले. शिवसेना उपमहानगरप्रमुख देवा जाधव यांनी अशोकनगर तर गोविंदनगर येथे अमोल जाधव यांनी शिबिराचे आयोजन केले होते.

सर्व रक्तदान शिबिरांना उपस्थित राहून माजीमंत्री बबनराव घोलप यांनी शिवसैनिकांचा उत्साह वाढविला तसेच अन्य मान्यवर नेत्यांनीही आपले सर्व कसब पणास लावल्याने आपणास रक्तदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात यश आले, असेही बडगुजर यांनी पुढे नमूद केले. आज14 जून रोजी जागतिक रक्तदानाच्या दिवशी ज्यांनी शिबिरे आयोजित केली. त्या सर्व आयोजकांचा शालिमार कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे, असे माजीमंत्री बबनराव घोलप म्हणाले.

भोर टाऊनशिप(सातपूर)येथे कोविडमुळे मृत्युमुखी पड़लेल्या कृटुंबातील सदस्यांना धान्य, कपडे वाटप करण्यात आले. तसेच मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ प्रत्येकी एक झाड लावण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उप विभागप्रमुख यशवंत पवार यांनी केले होते.

कार्यक्रमांना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंतराव गिते, माजी महापौर विनायक पांडे, मनपा गटनेते विलास शिंदे, विधानसभा प्रमुख प्रवीण तिदमे, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, नगरसेवक संतोष गायकवाड, मधूकर जाधव, हर्षदा गायकर, महानगर संघटक योगेश बेलदार, विधानसभा संघटक सुभाष गायधनी, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे आदी उपस्थित होते.

सातपूर आणि गोविंदनगर येथील शिबिरांस अनुक्रमे जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी आणि अर्पण रक्तपेढीच्या डॉक्टर व सेवकवर्गाचे सहकार्य लाभले. रणजीत हिंगमिरे, सागर कर्पे, सोपान जाधव, भास्कर चवळे, प्रतीक म्हस्के, अतुल पवार, मंजुनाथ नायडू, किशोर निकम, देविदास जाधव, खंडू पवार, स्वप्नील पासले आदींनी यावेळी रक्तदान केले. शिबिराप्रसंगी दीपक मौले, अलका गायकवाड, वृशाली सोनवणे,मनीषा लासुरे, लोकेश गवळी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com