जिल्ह्यात १४३१ बालके कुपोषण मुक्त

महिला व बालविकास विभागाच्या प्रयत्नांना यश
जिल्ह्यात १४३१ बालके कुपोषण मुक्त
USER

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांनी कोवीड-19 च्या महामारीच्या काळातही आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन करोना योद्धाप्रमाणे आपले कर्तव्य चोखपणे बजावले. यामुळे जिल्हयातील 1431 बालके वर्षभरात कुपोषण मुक्त झाले आहेत.

महिला व बालविकास विभागातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांनी कोवीड या महामारीच्या काळात घरोघरी जाऊन करोना योद्धाप्रमाणे नियमित गरम ताजा पोषण आहार, अमृत आहार, टी.एच.आर, तसेच पोषणकल्पवडी व मायकोन्यूट्रीएंन्ट हा अतिरिक्त आहार लाभार्थ्यांना वाटप केल्यामुळेच 1431 बालकांचे कुपोषण कमी झालेले आहे, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती आर्कि.अश्विनी आहेर यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या सहकार्याने कुपोषित बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जात असल्याने अचुक माहिती उपलब्ध होत आहे.

महिला व बालविकास विभागातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका, बालविकास अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपक चाटे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड या सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे महिला व बालकल्याण समिती सभेने याबद्दल आभार व्यक्त केले.

महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक सभापती आर्कि, अश्विनी अनिलकुमार आहेर यांच्या अध्यक्षतेखाली (ऑनलाईन गुगल मिट अ‍ॅपवर) झाली. बैठकीस समिती सदस्या कविता धाकराव, रेखा पवार, सुनिता सानप, गितांजली पवार-गोळे,कमल आहेर, गणेश अहिरे, शोभा बरके तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे व 26 प्रकल्पातील बालविकास अधिकारी सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com