तिसऱ्या फेरीसाठी १४ हजार ४८० जागा रिक्त

अकरावी प्रवेश
प्रवेश
प्रवेश

नाशिक | Nashik

महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत असेलेल्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रेवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शहरात दोन फेऱ्या झाल्यानंतर तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी आता १४ हजार ४८० जागा उपलब्ध आहेत.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत सुमारे ८ हजार १४० प्रवेश झाल्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

त्यामुळे दुसरी फेरी दीर्घ काळ रखडली होती. मात्र राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याच्या सूचना करतानाच २६ नोव्हेंबर पासून पुन्हा प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवत दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली. या दुसऱ्या फेरीत सुमारे २ हजार ६५० विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहे.

अशाप्रकारे अतापर्यंत एकूण १० हजार ७९० प्रवेश निश्चित झाले असून आता तिसऱ्या फेरीसाठी १४ हजार ४८० जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग एक व दोन भरण्यासोबतच महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात आली आहे.

मात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मूदतीत अर्ज भरून सबमिट करण्याची दक्षता घ्यावी तसेच मार्गदर्शक केंद्र व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियोजन वेळेत प्रमाणित करण्याच्या सुचनाही शिक्षण विभागाने केल्या आहेत .

अशी होईल तिसरी फेरी

१३ ते १४ डिसेंबर - पात्र उमेदवारांसाठी अंतीम गुणवत्ता यादी अंतीम करणे

१५ डिसेंबर - तिसऱ्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करणे

१५ ते १५ डिसेंबर - संधी मिळालेल्या माविद्यालयात प्रवेश निश्चित करणे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com