नाशिक जिल्हयात १४ खत विक्रेत्यांचे परवाने रद्द

नाशिक जिल्हयात १४ खत विक्रेत्यांचे परवाने रद्द

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हयात खरीप हंंगामाची लगबग सुरु होताच शेतकऱ्यांची काही खत विक्रेत्यांकडून फसवणूकीचे प्रकार समोर येत आहे. दरम्यान कृषी विभागाने याकडे लक्ष वेधले असून शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या कृषी विक्री केंद्रांवर भरारी पथकाने धाडी टाकून तीन आठवड्यात चौदा दुकानदाराचे परवाने रद्द केले आहेत...

नाशिक जिल्हयासाठी 2 लाख 58 हजार मेट्रीक ट्न रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 24 हजार मेट्रीक ट्न युरिया खत जिल्हयाला उपलब्ध झाले आहे. विक्रेत्यांनी खताची विक्री करताना छापील किंमतीमध्येच खते द्यावीत. अशा सुचना कृषी विभागाने जिल्हयातील विक्रेत्यांना खरीप हंगाम सुरु होण्याआधी दिलेल्या आहेत.

तर खत विक्री करताना कोणताही काळबाजार होउ नये याकरिता जिल्हयातील एकुण 1380 विक्रेत्यांना इ-पॉस मशीन देण्यात आले आहे. त्यानुसार खत विक्री करण्यासाठी बायोमेट्रीक मशीनचा वापर केला जातो आहे.

इ - पॉस मशीनवर शेतकर्‍यांचा अगठयाचा ठ्सा घेउन किंवा आधारकाड र् मोबाइल क्रमांक लिंक असल्यास ंमशीनमध्ये खते दिल्याची नोंद होते. याचा संदेश त्या शेतकर्‍याच्या मोबाइलवर मेसेज येतो.

तसेच या सर्वाची माहिती कृषी विभागाला दुकानदारांना द्यावी लागते, मागील काही दिवसांमध्ये भरारी पथकाने मालेगांव, नांद्गगाव, उमराणे याठिकाणच्या विक्री केद्रावर धाडी टाकून कारवाइ केली आहे. दुकानांच्या बाहेर खत साठा, त्यांचे भाव आदी माहिती लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com